scorecardresearch

VIDEO : कंगना रणौत मथुरेतून लढणार का? हेमा मालिनी म्हणतात, उद्या राखी सावंतही…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत भारतीय जनता पार्टीकडून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

VIDEO : कंगना रणौत मथुरेतून लढणार का? हेमा मालिनी म्हणतात, उद्या राखी सावंतही…
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत भारतीय जनता पार्टीकडून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी सध्या मथुरा मतदारसंघातून भाजपा खासदार आहेत.

कंगना राणौत मथुरेतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता हेमा मालिनींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौत मथुरेतून लढणार असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यावर मी माझे विचार कशाला प्रकट करू, माझे विचार देवाला माहीत आहेत. मथुरेत कुणी खासदार असावं, हे भगवान श्रीकृष्ण ठरवतील.

हेही वाचा- “विरोधीपक्षातील नेते सतत सीबीआय, ईडी आणि पोलिसांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत” कपिल सिब्बल यांचं विधान

प्रसारमाध्यमांना उद्देशून हेमामालिनी पुढे म्हणाल्या की, मथुरेतील ज्यांना खासदार बनायचं आहे, त्यांना तुम्ही बनू देणार नाहीत. तुम्हाला मथुरेत सर्व बॉलिवूड कलाकार हवे आहेत. उद्या राखी सावंतही निवडून येऊ शकते, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

खरं तर, मागील काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्रींने अनेकदा विविध निर्णयांमध्ये भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलं आहे. भाजपाच्या विविध योजनांना त्यांनी खुल्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मथुरा मतदारसंघातून कंगना राणौत निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हेमा मालिनी या मथुरेच्या विद्यमान खासदार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या