ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी देशातील ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यावा अशी शिफारस केली आहे. प्रमुख भारतीय जीनोम शास्त्रज्ञांनी ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य देऊन करोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. भारतीय SARS-CoV-२ जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) च्या साप्ताहिक अहवालामध्ये ही शिफारस करण्यात आली आहे. आयएनएसएसीओजी हे करोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे.

आयएनएसएसीओजीच्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार ज्या लोकांचे लसीकरण केले गेले नाही अशा लोकांना जास्त धोका असतो आणि त्यांनी आधी लसीकरण केले पाहिजे. तसेच ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. यामध्ये, उच्च जोखीम आणि उच्च धोका असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाऊ शकते. देशातील करोनाच्या परिस्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान खासदारांनी कोविड लसींच्या बूस्टर डोसच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.

ओमायक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी की बूस्टर डोस घ्यावा लागणार?; अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

आयएनएसएसीओजीने सांगितले की आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाय सक्षम करण्यासाठी बुस्टर डोसबाबत निर्णय घेण्यासाठी जीनोमिक सिक्वेन्सिंग महत्वाचे आहे. शास्त्रज्ञांच्या या संघटनेने प्रवासावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनने प्रभावित आफ्रिकन देशांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि करोना विषाणूच्या प्रकरणांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग देखील केले पाहिजे. जेणेकरून बाधित भागात त्याचा संसर्ग शोधला जाऊ शकेल. चाचण्यांची संख्या, प्रतिबंधात्मक उपाय लागू केले जाऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की काही देशांनी सीमा बंद करण्याच्या उपायांचा उपयोग केल्याने करोना विषाणूच्या ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी वेळ मिळू शकतो. पण डेल्टा पॅटर्नला सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि त्यातून मिळालेल्या अनुभवांनी जागतिक महामारीशी लढण्याचा पाया रचला गेला पाहिजे.