मध्य प्रदेशात मगरीने आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मुलगा सोमवारी सकाळी चंबल नदीत आंघोळ करत असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने मुलाला नदीच्या आत ओढून नेलं होतं. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मुलाच्या कुटुंबीयांना बोलावलं. गावकऱ्यांनी जाळी, काठ्या आणि दोरीच्या सहाय्याने मगरीला नदीबाहेर काढलं.

यादरम्यान घटनेची माहिती मिळताच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून मगरीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाचे कुटुंबीय मगर सोपवण्यास तयार नव्हते. मगरीच्या पोटात मुलगा जिवंत असेल अशी त्यांना आशा होता. जोपर्यत मगरीच्या पोटातून मुलगा बाहेर पडत नाही तोवर आपण मगरीला सोडणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली होती.

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलगा नदीत आंघोळ करताना फार आतमध्ये गेला होता. गावकऱ्यांनी मगरीने मुलाला गिळल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी जाळी आणि काठ्यांच्या सहाय्याने मगरीला पकडलं. यासंबंधी संबंधित विभाग कारवाई करत आहे”. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर अखेर गावकऱ्यांनी मगरीची सुटका केली.