boyfriend killed 20 year old woman clicks selfie with suitcase before dumping body Crime News : एका २० वर्षीय तरूणीची हत्या केल्याप्रकरणी कानपूर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. या तरूणीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून ९५ किलोमीटर दूर बांदा येथे यमुना नदीत फेकून देण्यात आला होता. हा प्रकार उजेडात आल्यानंतर फतेहपूरच्या हरिखेडा येथील इलेक्ट्रिशन सूरज आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा त्याचा मित्र आशिष या दोघांना अटक करण्यात आली आहे. हत्येची घटना ही २१ जुलै रोजी कानपूरच्या हनुमंत विहार येथे घडली होती.
पीडित तरूणी आकांक्षा तिची मोठी बहीण प्रतिक्षाबरोबर बर्रा येथे राहत होती. वर्षभरापूर्वी तिची सूरज याच्याबरोबर इंस्टाग्रामवरून मैत्री झाली. सुरजने तिला बर्रा येथे एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवून दिली आणि नंतर तिने हनुमंत विहार येथील दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करावी असे त्याने सुचवले.
त्यानंतर आकाक्षा एका सूरजने बघून दिलेल्या प्रमोद तिवारी यांच्या घरातील भाड्याच्या खोलीत राहायला गेली, जेथे तो तिला भेटू शकत होता. या दोघांच्या नात्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजचे दुसर्या एका महिलेबरोबर संबंध समोर आल्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले.
या दोघांमध्ये रेस्टॉरंटमध्ये वाद झाला, त्यानंतर घरी देखील भांडण झाले. जेथे सूरजने कथितपणे गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मित्र आशिष याला फोन केला.
त्यानंतर या दोघांनी आकांक्षाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि तो घेऊन बांदा येथील चिल्ला घाट येथे घेऊन गेले आणि त्यानंतर सूटकेस त्यांनी यमुना नदीत फेकून दिली. पोलिसांनी सांगितले की, सूटकेस फेकून देण्याच्या आधी त्यांनी त्याबरोबर सेल्फी काढून ती ऑनलाईन पोस्ट केली. पण याबद्दल त्यावेळी कोणालाही संशय आला नाही.
नेमकं काय घडलं?
आकांक्षांची आई विजयश्री म्हणाल्या की, मुलीचा फोन २२ जुलै रोजी बंद झाला. तिला शोधण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र बर्रा आउटपोस्ट आणि पोलीस कमिश्नर कार्यालयाला भेटी देऊनही हरवल्याची तक्रार ८ ऑगस्टपर्यंत दाखल करून घेण्यात आली नाही. १६ सप्टेंबर रोजी विजयश्री यांनी सूरजच्या विरोधात तक्रार दाखल केली ज्यामुळे तपास करण्यात आला आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
कॉल डिटेल रेकॉर्ड आणि मोबाईल लोकेशन डेटा यांच्या माध्यमातून पोलिसांनी पुष्टी केली की आकांक्षा आणि सूरज हे हत्या झाली त्या रात्री सोबत होते, त्यानंतर सूरजने गुन्ह्याची कबुली दिली.
सूरजने मान्य केले की दोघांमधील वाद विकोपाला जाऊन मारहाण सुरू झाली ज्यामध्ये त्याने तिचा गळा आवळला. त्याने दावा केला की ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप करण्याची धमकी देत होती.
डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस (दक्षिण) दीपेंद्र नाथ चौधरी म्हणाले, आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, ज्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. हनुमं विहार स्टेशनचे अधिकारी राजीव सिंह यांनी सांगितले की, मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर सूरजने आकांक्षाचा मोबाइल पोलिसांना चकवा देण्यासाठी बिहारला जाणाऱ्या रेल्वे कोचमध्ये लपवला. सूरजच्या मोबाइलमधून मिळालेल्या फोटोवरून पोलीस आकांक्षाचा मृतदेहाचा शोध घेतल आहेत.