शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांनी मागणी फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

काय आहे आरोप?

शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्गने जी टूलकिट ट्विट केली होती. त्या टूलकिट संदर्भात दिशाला प्रमुख संयशित आरोपी म्हणून अटक करण्यात होती. शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिटमध्ये दिशाने बदल केले. त्यात काही मुद्दे टाकले आणि ती टूलकिट पुढे पाठवली, असा आरोप दिल्ली पोलिसांनी तिच्यावर केलेला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलीस दिशासह निकीता जेकब आणि शंतनू मुळूक यांचीही चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breaking a delhi sessions court grants bail to disha ravi in toolkit fir bmh
First published on: 23-02-2021 at 16:04 IST