जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात मंगळवारी सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोव्हेंबर महिन्यात नऊ सुरक्षा रक्षकांसह एकूण १५ जण पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात ठार झाले. बीएसएफ रायझिंग डे साजरा करीत असतानाच उपनिरीक्षक शहीद होण्याची घटना घडली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी क्षेत्रात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक पी. ग्युइट हे शहीद झाले.  ग्युइट यांनी    सहकाऱ्यांचे प्राणही वाचविले. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात  लष्कराचे  चार जवान,  बीएसएफ अधिकाऱ्यासह ११ जण शहीद झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsf officer martyred in pakistani firing zws
First published on: 02-12-2020 at 01:20 IST