पीटीआय, सहारणपूर

सत्ताधारी भाजपची उक्ती आणि कृती यामध्ये फरक असल्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा सत्तेत येणे सोपे असणार नाही, असा दावा बसपप्रमुख मायावती यांनी रविवारी केला. मायावती या सात वर्षांनंतर प्रचारमोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथून त्यांनी आपल्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजपवर जनतेशी खोटे बोलल्याचा आणि सामथ्र्यवान लोकांच्या हितासाठी काम केल्याचा आरोप केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपला पक्ष कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे आणि तिकीट वाटपात समाजाच्या सर्व स्तरांना योग्य वाटा दिला आहे, असे मायावती यांनी भाषण करताना सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. भाजपवर टीका करताना मायावती म्हणाल्या की, ‘‘गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष केंद्रात आणि बहुसंख्य राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. त्यांच्या जातीयवादी, भांडवलवादी, संकुचित व सूडाची धोरणे आणि काम करण्याची शैली आणि त्यांच्या उक्ती व कृतीमधील लक्षणीय फरक यामुळे आता असे दिसते की, निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झाल्या तर त्यांना पुन्हा सत्ता मिळणे सोपे असणार नाही’.