Union Budget 2022 : सरकारने सोमवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने शेअर बाजाराला संजीवनी दिली. आर्थिक सर्वेक्षणातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स ८०० अंकांच्या वाढीसह ५८,०१४.१७ वर बंद झाला होता. खरेदीचा कल वाढल्याने निफ्टीही १७,३३९ वर पोहोचला. अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काही तास उरले आहेत, त्यामुळे आज शेअर बाजाराचा कल काय असेल हा मोठा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात १० वर्षांचा इतिहास काय सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ मध्ये सेन्सेक्स ५ टक्क्यांनी वाढला –

अर्थसंकल्प २०२१ च्या दिवशी सेन्सेक्समध्ये ५ टक्क्यांची उसळी दिसून आली. पुढील सहा दिवस चढ-उताराचा हा ट्रेंड कायम राहिला. त्यानंतर बाजारात सुधारणांचा कालावधी सुरू झाला आणि २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तो मोठ्या प्रमाणात दुरुस्त झाला होता.

अर्थसंकल्प- २०२० ची स्थिती –

२०२० मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स २.४२ टक्क्यांनी घसरला होता. मात्र, अर्थसंकल्पानंतर पुढील आठवडाभरात बाजारात ३.५३ टक्क्यांची सुधारणा दिसून आली. एकूणच, बाजार घसरला तर तो लवकर सावरतो.

१ फेब्रुवारी २०१९ –

१ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. त्यादरम्यान सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ०.५९ टक्क्यांची वाढ झाली होती. अर्थसंकल्पानंतर पुढील तीन दिवस बाजारात तेजीचे वातावरण होते.

१ फेब्रुवारी २०१८ –

यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर बाजारात घसरणीचा काळ होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यवसायात १.२९ टक्क्यांची घसरण झाली होती. अर्थसंकल्पाचे पुढील तीन दिवसही अर्थसंकल्पात घसरणीचा काळ होता.

Budget 2022 Live: एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार – निर्मला सीतारामन

१ फेब्रुवारी २०१७ –

१ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पाचे बाजारातून स्वागत झाले. अर्थसंकल्पादरम्यान सेन्सेक्सने १.७६ टक्क्यांची उसळी घेतली होती. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स १.८२ टक्क्यांनी वधारला होता.

२९ फेब्रुवारी २०१६ –

२९ फेब्रुवारी २०१६ रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स २.८५ टक्क्यांनी घसरला होता. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर निफ्टीही घसरला होता. मात्र, त्यानंतरच्या सहा सत्रांत बाजारात तेजी दिसून आली.

२८ फेब्रुवारी २०१५ –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स ०.४८ टक्क्यांनी वाढला होता. अर्थसंकल्पाचे पुढील दोन दिवस बाजारात तेजी होती.

१७ फेब्रुवारी २०१४ –

१७ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. निवडणुकीपूर्वी आलेल्या या अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. अर्थसंकल्पानंतर दोन दिवसांपर्यंत शेअर बाजारात तेजी होती.

२८ फेब्रुवारी २०१३ –

२०१३-१४ चा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सादर केला होता. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजार १.८७ टक्क्यांनी घसरला होता. नंतर दिवसभराच्या व्यवहारात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्सने १.५२ टक्क्यांची घसरण नोंदवली होती.

१६ मार्च २०१२ –

२०१२ मध्ये अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यवहारात घट झाली आणि सेन्सेक्स बेंचमार्क निर्देशांक १.१९ टक्क्यांनी घसरला होता. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स १.१ टक्क्यांनी घसरला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2022 stock market to set a record find out from the ten year history how will the market go msr
First published on: 01-02-2022 at 09:48 IST