वृत्तसंस्था, तेहरान, वॉशिंग्टन

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या तपासासाठी सहकार्य करण्याची इराणची विनंती अमेरिकेने नाकारली आहे. लॉजिस्टिक्सच्या कारणामुळे तपासात सहाय्य करणे शक्य नसल्याचे अमेरिकेने सोमवारी स्पष्ट केले. रईसी यांचे हेलिकॉप्टर रविवारी दुर्घटनाग्रस्त होऊन त्यामध्ये त्यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाला.

Putin thanks North Korea for support in Ukraine
अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्यास सहकार्य; युक्रेनमधील पाठिंब्याबाबत पुतीन यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभारप्रदर्शन
Joe Biden ad campaign against Donald Trump
बायडेन यांची ट्रम्पविरोधात जाहिरात मोहीम; पहिल्या चर्चेपूर्वी ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार
ukraine peace summit world leaders gather in support of ukraine
युक्रेन शांतता आराखड्यासाठी जागतिक नेते एकत्र
mirzapur homeguard died on election duty
इलेक्शन ड्युटीवर असताना उष्णतेमुळे मिर्झापूरच्या पाच होमगार्डचा मृत्यू; त्यांच्या मृत्युला जबाबदार कोण?
kuwait fire update
Kuwait Fire Update : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना, कोची विमानतळावर रुग्णवाहिकेसह पोलीस तैनात!
Gadchiroli, Puttewar murder,
गडचिरोली : ‘पुट्टेवार’ हत्याकांड; अर्चना पुट्टेवार, प्रशांत पार्लेवारची अटक टाळण्यासाठी काँग्रेस नेत्याची…
Mallikarjun Kharge Said This Thing about Narendra Modi
“दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन..”, मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका
elon musk apple reuters
“…तर आम्ही iphone सह Apple च्या सर्व उत्पादनांवर बंदी घालू”, एलॉन मस्क यांची धमकी

आम्हाला रईसी यांची कार्यपद्धती मान्य नसली तरी कोणत्याही जीवितहानीचे आम्हाला दु:ख आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, रईसी यांनी जवळपास चार दशके इराणी जनतेचे क्रूरपणे दमन केले आहे याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही.

दरम्यान, अध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसेन अब्दुल्लाहिया आणि इतरांचे मृतदेह मंगळवारी तेहरानमध्ये आणण्यात आले. शिया प्रथेप्रमाणे त्यांच्या दफनविधीपूर्वी शोक पाळला जाणार असून त्याला मंगळवारी सुरुवात झाली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

हेही वाचा >>>मोदींच्या भाषणांत विकासापेक्षाही काँग्रेस, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर जोर; पाच टप्प्यांत १११ भाषणे

इराणच्या ‘आयआरएनए’ या सरकारी वृत्तसंस्था आणि सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षांचे खास विमान इब्राहिम रईसी यांचा मृतदेह असलेली शवपेटी घेऊन मंगळवारी तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर उतरले. अध्यक्षांच्या विमानामधील त्यांचे आसन रिक्त ठेवले होते. त्यावर काळे कापड टाकून रईसी यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. तेहरानच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा बंदोबस्त ठेवण्यात आला.

दफनविधीसाठी सर्व मृतगेह कोम या पवित्र शिया शहरामध्ये नेली जाणार आहे, तिथे प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी तेहरानच्या ‘ग्रँड मोसल्ला मशिदी’त मोठा कार्यक्रम होईल. त्या दिवशी मिरवणुकीसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असून देशभरातील सर्व कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी, रईसी यांचे मूळ गाव असलेल्या बिर्जंद येथे अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर मशाद येथील इमार रझा या पवित्र स्थळी दफनविधी केला जाईल.

सामूहिक निदर्शनांचे महत्त्व

इराणच्या शिया धर्मशाही सामूहिक निदर्शने महत्त्वाची मानली जातात. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे स्वागत करण्यासाठी तेहरानमध्ये लाखोंची गर्दी झाली होती. त्यांतर १० वर्षांनंतर त्यांच्या दफनविधीसाठीही लाखो लोक जमले होते. अमेरिकेने २०२०मध्ये बगदादवर केलेल्या हवाई हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्डचे जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते. त्यावेळीही जवळपास १० लाख लोक त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यासाठी एकत्र आले होते.

भारताकडून इराणला शोकसंदेश

रईसी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये मंगळवारी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या दूतावासाला भेट देऊन अध्यक्ष रईसी, परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहिया यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे भारताचे प्रतिनिधी म्हणून इब्राहिम रईसी यांच्या दफनविधीला उपस्थित राहणार आहेत. धनखड हे बुधवारी इराणला रवाना होतील.