उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला असून १५ लोक जखमी झाले आहेत. बहराइचच्या टप्पे सिपाह भागात ही दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. “जयपूरमधून निघालेली बस बहराइचला जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली”, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी डॉ. दिनेश चंद्रा यांनी दिली आहे. जखमींपैकी चारजणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चंद्रा यांनी दिली आहे.

UP Fire: फिरोजाबादमधील आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींवर योग्य उपचारांसाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.