देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत उमेदवारांच्या यश-अपयशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. या जागांसाठी १२ एप्रिल रोजी मतदान झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र –

महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपाने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवलं होतं. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

पश्चिम बंगाल –

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूलने शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट दिले आहे. या हायप्रोफाईल जागेवर टीएमसीचे उमेदवार सिन्हा यांचा सामना भाजपाच्या अग्निमित्रा पॉल यांच्याशी आहे. बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. बाबुल सुप्रियो यांनी भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.

तर दुसरीकडे, बाबुल सुप्रियो यांना टीएमसीने बालीगंज विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. या जागेवर बाबुल यांची भाजपाच्या किया घोष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांच्याशी लढत आहे. टीएमसीचे आमदार आणि ममता सरकारमधील कॅबिनेट मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

छत्तीसगड –

याशिवाय छत्तीसगडच्या खैरागड जागेवरही भाजपा आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा माजी आमदार कोमल जंघेल यांना उमेदवारी दिली आहे, तर सत्ताधारी काँग्रेसने यशोदा वर्मा यांच्यावर विश्वास विश्वास दाखवत त्यांना उमेदवीरी दिली आहे. यासोबतच जनता काँग्रेसने खैरागड राजघराण्याचे जावई नरेंद्र सोनी यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) चे आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली होती.

बिहार –

विकास इंसान पार्टी (VIP) कडून डॉ. गीता देवी आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) कडून अमर पासवान बिहारच्या बोचाहान विधानसभा जागेसाठी उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाने बेबी कुमारीला तर काँग्रेसने तरुण चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. विकास इंसान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनानंतर बोचहान जागेवर पोटनिवडणूक झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By election results 2022 results of one lok sabha and four vidhan sabha elections across the country today msr
First published on: 16-04-2022 at 11:08 IST