केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांचा महगाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱया सर्व कर्मचाऱयांना याचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचाऱयांकडूनही आता याच पद्धतीने महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी आणखी जोमाने करण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात राज्यातील कामगार संघटनांनी महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2015 रोजी प्रकाशित
केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱया सर्व कर्मचाऱयांना लाभ मिळणार
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 09-09-2015 at 13:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet approves 6 per cent hike in da for central government employees