कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी सोमवारी निवृत्त होताना केलेल्या समारोपाच्या भाषणामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे जाहीर केले. मात्र, न्यायाधीश म्हणून काम करताना ३७ वर्षांच्या काळात आपण संघापासून दूर राहिलो असेही त्यांनी सांगितले.न्या. दास यांनी गेल्या १४ वर्षांपासून उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. कलकत्ता उच्च न्यायालयात येण्यापूर्वी ते ओडिशा उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

हेही वाचा >>> Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

कलकत्ता उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि बारचे सदस्य यांच्या उपस्थितीत समारोपाच्या समारंभात भाषण करताना न्या. दास बोलावणे आले तर कोणतेही सहाय्य करायला किंवा त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्यासाठी ते परत संघात जायला तयार आहेत असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘काही लोकांना हे आवडणार नाही, मी येथे हे कबूल केले पाहिजे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. मी त्या संघटनेला खूप काही देणे लागतो. मी माझ्या बालपणापासून आणि संपूर्ण युवावस्थेत संघात होतो.’’ मी धाडसी, प्रामाणिक आणि इतरांबद्दल समानता बाळगण्यास शिकलो, त्याशिवाय राष्ट्रभक्ती आणि कामाप्रति निष्ठा शिकलो असे दास यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्या. दास पुढे म्हणाले की, ‘‘मी संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना समान वागणूक दिली, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, साम्यवादी असो किंवा भाजपचा, काँग्रेसचा किंवा तृणमूल काँग्रेसचा सदस्य असो.’