दिल्लीला लागूनच असलेल्या गुडगावमधील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱया महिलेवर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिल्लीमध्ये राहणाऱया या तीस वर्षांच्या महिलेवर दोघांनी गाडीमध्ये बलात्कार केला.
संबंधित महिला डीएलएफ सिटीमधील एका कॉलसेंटरमध्ये काम करते. बुधवारी रात्री कामावरून परतताना तिने एका कारचालकाकडे लिफ्ट मागितली. गाडीमध्ये बसल्यावर त्यातील दोघा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही तिला रस्त्यात टाकून पळून गेले. संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत.
(सोबतच्या छायाचित्राचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही)
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
गुडगावमध्ये कॉल सेंटरमधील महिलेवर सामुहिक बलात्कार
दिल्लीला लागूनच असलेल्या गुडगावमधील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱया महिलेवर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली

First published on: 07-03-2013 at 06:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Call centre employee sexually assaulted in car