डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांच्यावर ३४ हजार कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचे आरोप आहेत. अटकेनंतर त्यांना आज दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही ; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सायंकाळी धीरज वाधवानला यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याप्रकरणी सीबीआयने २०२२ मध्येच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. महत्त्वाचे म्हणजे येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या ते जामीनावर बाहेर होते.

हेही वाचा – लाच घेतल्याच्या आरोपाखाली सहाय्यक संचलाकासह चौघांना अटक, सीबीआयची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीबीआयने २०२२ मध्ये एकूण १७ बँकांची ३४ हजार कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी २०१० ते २०१८ दरम्यान डीएचएफएलला ४२ हजार ७८१ कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी मिळून हेराफेरी केली आणि मे २०१९ पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची फसवणूक केली, असं सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगण्यात आले होते.