CBI arrests IRS officer amit kumar Singhal Crime news : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी रात्री आयआरएस अधिकारी डॉ. अमित कुमार सिंघल यांना रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली आहे. फूड फ्रेंचाइजी ला पिनोसचे मालक सनम कपूर यांनी आयआरएस अधिकारी सिंघल यांच्याविरोधात लाच मागीतल्याची तक्रार केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

आआरएस अधिकाऱ्याला त्याच्या दिल्लीतील घरार आयकर नोटीस निकाली काढण्याच्या बदल्यात मध्यस्थाच्या मदतीने ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयच्या टीमने अटक केली आहे. ला पिनोसच्या मालकाने दावा केला होता की त्यांच्या कंपनीच्या मालकांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

२०१७ मध्ये सनम कपूर यांनी मुंबईतील एक व्यवसायिक हर्ष कोटक यांच्याबरोबर फ्रेंचाइजी करार केला होता, जे कथितपणे त्या व्यवसायात सिंघल यांच्या आईबरोबर भागीदारी करत होते. कपूर यांचे वकील गगनदीप सिंह जम्मू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर यांना गेल्या वर्षी माहिती झालं की त्यांच्यातील कराराचे उल्लंघन करत कोटक यांनी इतर स्त्रोतांकडून स्वस्तात कच्चा माल खरेदी करणे सुरू केले आहे आणि यानंतर त्रास देणे सुरू झाले.

४५ लाखांची लाच मागितली

सनम कपूर यांच्याकडे फ्रेंचाइजी करार रद्द करण्याचा पर्याय होता, मात्र त्यांना कथितपणे १.६ कोटी रुपयांमध्ये तो पुन्हा परत खरेदी करण्यास भाग पाडण्यात आले, जो मूळ किंमत २५ लाखांपेक्षा सहा पट जास्त आहे. सनम कपूर यांनी त्यानंतर आयकर आणि काद्य सुरक्षा विभागाच्या नोटीसा पाठवण्यात येऊ लागल्या. जम्मू यांनी आरोप केला की सिंघल यांनी आयकर नोटीसा बंद करण्यासाठी ४५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर कपूर यांनी सीबीआयशी संपर्क साधला.

अशी झाली अटक

३० मे रोजी कोटक यांनी चंदीगड येथे कपूर यांची भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी सिंघल यांना मोहाली येथील घरी बोलवले. सीबीआयने सापळा रचला आणि ३१ मे रोजी जेव्हा त्याने कपूर यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले तेव्हा कोटक याला अटक करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीबीआयच्या एका टीमने सिंघल यांना त्यांच्या दिल्ली येथील घरातून अटक केली आणि तपासणीत त्याच्याकडे दोन दिलो सोन्याचे दागिने आणि ३० लाख रुपयांची रोकड देखील जप्त केली.