scorecardresearch

Premium

महिलांच्या नग्न धिंडप्रकरणी ‘सीबीआय’चे आरोपपत्र; मणिपूरमध्ये अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध आरोप

मणिपूरच्या कंगपोक्पि जिल्ह्यात मे महिन्यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलगा आणि सहा जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी आरोपपत्र दाखल केले.

CBI
महिलांच्या नग्न धिंडप्रकरणी ‘सीबीआय’चे आरोपपत्र; मणिपूरमध्ये अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध आरोप ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

मणिपूरच्या कंगपोक्पि जिल्ह्यात मे महिन्यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलगा आणि सहा जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी आरोपपत्र दाखल केले.

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?
akola, Senior Civil Court, Defamation Suit, Dismisses, Intak Leader, bjp and shinde group, mla,
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?
objectionable tapes
गडचिरोली : ‘हनीट्रॅप’ प्रकरणात आक्षेपार्ह चित्रफीत पोलिसांच्या हाती, पत्रकाराच्या…
Nandurbar Hamali contract
ठाण्यानंतर नंदुरबारमध्येही सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष, हमाली ठेक्यावरुन हाणामारीसह अपहरणप्रकरणी भाजपच्या माजी आमदाराविरुद्ध गुन्हा

मेमध्ये झालेल्या या घटनेची ध्वनिचित्रफीत जुलैत सर्वदूर प्रसृत झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. जगभरात या घटनेचे पडसाद उमटले होते आणि निषेध करण्यात आला होता. या गंभीर घटनेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवला होता.

‘सीबीआय’ने गुवाहाटी येथील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयात सहा जणांविरुद्ध आरोपपत्र आणि एका विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाविरुद्ध अहवाल दाखल केला. त्यातील आरोपानुसार ४ मे रोजी सुमारे ९०० ते एक हजार जणांचा जमाव, अत्याधुनिक शस्त्रे घेऊन, मणिपूरच्या कांगपोक्पि जिल्ह्यातील बी फायनोम गावात घुसला. या जमावाने तेथे तोडफोड केली आणि घरे जाळली आणि मालमत्ता लुटली. ग्रामस्थांवर हल्लेही केले. हत्या केल्या आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केले. नग्न धिंड काढलेल्या एका महिलेच्या कुटुंबातील दोन सदस्यांचाही या हिंसाचारात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“डेंग्यू-मलेरियाचा मच्छर निघाला…”, ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्यांवर संतापलेल्या उदयनिधींना भाजपाचा टोला

मणिपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा या घटनेत सहभाग असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात निदर्शनास आल्यानंतर सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्यासह प्रकरणाच्या इतर पैलूंचा तपास सुरू आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cbi charges against six people including a minor in manipur women nudity scandal amy

First published on: 17-10-2023 at 00:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×