सीबीएसई पेपर फुटीप्रकरणी झारखंड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून ९ जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले संशयित स्टडी व्हिजन नावाच्या खासगी कोचिंग सेटंरशी संबंधित आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेली व्यक्ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आता पेपरफुटी प्रकरणी वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिघा जणांना अटक करण्यात आली असून ९ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एसआयटीकडून अजूनही तपास सुरू आहे, अशी माहिती छतराच्या पोलीस अधिक्षकांनी माध्यमांना दिला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेतले आहेत. पहिला गुन्हा हा बारावीचा अर्थशास्त्राच्या पेपरफुटीप्रकरणी तर दुसरा गुन्हा हा दहावीच्या गणित विषयाच्या पेपर फुटी प्रकरणाचा आहे.

दरम्यान, पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला सतीश पांडे हा अभाविपचा पदाधिकारी असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मुलांच्या भवितव्याबरोबर खेळणे हाच अभाविपचे काम आहे. गेल्या अनेक घटनांपासून अभाविपचे हे चित्र आपण पाहत आहोत, असे ट्विट मुंबई काँग्रेस आणि एनएसयूआयने केले आहे. दरम्यान, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. याप्रकरणी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सीबीएसईला प्रतिवादी करण्यात आले आहे. परीक्षा झालेल्या आहेत. त्याच आधारावर निकाल घोषित केले जावे आणि खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीबीआयने तपास करावा, असे याचिकेत म्हटले आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse paper leak main culprit an abvp leader alleges congress
First published on: 31-03-2018 at 19:53 IST