CBSE ने UGC NET 2017 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या २०१६ च्या यूजीसी द्वितीय (UGC-II) परीक्षा दिलेले विद्यार्थी cbsenet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. उशिराने झालेल्या या परीक्षेचे निकालही उशिराने लागतील असे सांगण्यात येत होते. परंतु, यूजीसीने वेळेत निकाल जाहीर केला.

या परीक्षेचे निकाल जाहीर केल्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सीबीएसईने नुकतेच या परीक्षेची ‘आन्सर की’ प्रसिद्ध केली होती. या परीक्षेतील पहिले सेक्शन हे १०० गुणांचे होते. यामध्ये ६० पैकी ५० प्रश्नांचे १ तास १५ मिनिटांत उत्तर देणे आवश्यक होते. दुसऱ्या सेक्शनमध्ये १०० पैकी ५० प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते. तिसऱ्या सेक्शनमध्ये १५० गुणांसाठी ७५ प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे होते. सीबीएसईने या परीक्षेचे २२ जानेवारी २०१७ रोजी आयोजन केले होते. ही परीक्षा ९० केंद्रांवर घेण्यात आली होती.

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

कसा पाहाल CBSE UGC NET 2017 चा निकाल

– cbsenet.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

– त्यानंतर परीक्षेशी संबंधित लिंकवर क्लीक करा.

– लिंकवर क्लीक केल्यानंतर सूचनांचे पालन करत आवश्यक ती माहिती भरावी.

– त्यानंतर सबमिट करून आपले गुण पाहा.

– निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंटही काढू शकता.

राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा ‘यूजीसी नेट’ ही राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आहे. पदवीनंतर ही परीक्षा देता येते. वर्ष २००९ नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयात प्राध्यापक बनण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.