अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कमला हॅरिस यांचं आव्हान आहे. जो बायडेनपेक्षा कमला हॅरीस अधिक मजबूत असल्याचं नवं सर्वेक्षणही आता समोर आलं आहे. दरम्यान, बायडेन यांनी या निव़णुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरीस यांच्या बाजूने समर्थन वाढलं आहे.

बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर केलेले सर्वेक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरीही आधीच्या सर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात बायडेनपेक्षाही कमला हॅरिस यांची कामगिरी किंचित चांगली आहे, असं वृत्त दि हिंदूने दिले आहे.

देशव्यापी फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प हे मत दिलेल्या लोकांमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यापेक्षा फक्त एक गुण अधिक आघाडीवर आहेत. सर्वक्षणानुसार ४९ टक्के मतं डोनाल्ड ट्रम्प, बायडेन यांना ४८ टक्के तर, कमला हॅरीसनाही ४८ टक्के समर्थन मिळालं आहे.

हेही वाचा>> विश्लेषण : बायडेन यांच्या पाठिंब्यानंतरही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता? ट्रम्पसमोर कितपत संधी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या प्रकृतीवरून टीका केली होती, तसंच यावरून त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया तयार झाली आहे. तसंच, काही सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की कलमा हॅरीस या जो बायडेनपेक्षा १ किंवा २ गुणांनी किंचित पुढे आहेत.

गेल्या आठवड्यात CBS/YouGov ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, कमला हॅरीस आघाडीवर आहेत. ट्रम्प हॅरीसपेक्षा तीन गुणांनी (५१%-४८%) आणि बायडेन पाच गुणांनी (५२%-४७%) पुढे होते. जुलै इकॉनॉमिस्ट/YouGov पोलच्या सर्वेक्षणानुसार कमला हॅरीस या ट्रम्प यांच्याकडून काही गुणांनी पराभूत होऊ शकतात. या निवडणुकीत ४१ ते ४३ टक्क्यांनी वाईट कामगिरी करतील.

जो बायडेन सरकारमध्ये काम करण्यास अक्षम

अगदी अलीकडे, ट्रम्प यांच्या गोळीबाराच्या प्रयत्नानंतर केलेल्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बायडेन आणि हॅरीस हे ट्रम्प यांच्या बरोबर आहेत. परंतु, ६९ टक्के लोकांना असे वाटते की बायडेन यांचं वय झालं असून ते सरकारमध्ये आता काम करू शकत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॅरिस यांनी कृष्णवर्णीय मतदारांमध्ये ट्रम्प यांना मागे टाकले

पेनसिल्व्हेनिया आणि व्हर्जिनियाच्या नव्या न्यूयॉर्क टाईम्स/सिएना कॉलेज पोलमध्ये, कमला हॅरिस यांनी जो बायडेन यांना २ गुणांनी मागे टाकले. तर NBC पोलमध्ये सर्वात हॅरिस यांच्याबाजूने कल दिसतोय. आपल्या भारतीय वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या उपराष्ट्रपतींनी कृष्णवर्णीय मतदारांमध्ये लक्षणीय प्रभाव पाडला असून, बायडेन यांच्या ५७-पॉइंट आघाडीच्या तुलनेत ट्रम्प यांना तब्बल ६४ गुणांनी आघाडी मिळाली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, एका डेमोक्रॅटिक पोलिंग फर्मीच्या सर्वेक्षणानुसार हॅरिस ९ जुलै रोजी झालेल्या मतदानात माजी राष्ट्रपतींपेक्षा ४१ ते ४२ टक्क्यांनी आघाडीवर आहेत.