चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरपासून काल वेगळा झालेला विक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचला आहे. सात सप्टेंबरला मध्यरात्री १.५५ च्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. अवघ्या चार सेकंदाच्या ऑपरेशनमध्ये विक्रम लँडरने चंद्राच्या नव्या कक्षेत प्रवेश केला. स्वदेशी बनावटीच्या या लँडरमधील प्रोप्लशन सिस्टिम पहिल्यांदाच प्रज्वलित करण्यात आली. यापूर्वी कक्षा बदल करताना चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरची प्रोप्लशन सिस्टिम प्रज्वलित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑर्बिटर पुढचे वर्षभर चंद्राभोवती फिरत रहाणार असून चंद्रावरील भूप्रदेश, वातावरण आणि खनिज याची माहिती गोळा करणार आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेमुळे चंद्राबद्दल आजवर अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी जगाला समजणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे लँडिंग होणार असून अजूनपर्यंत कुठलाही देश चंद्राच्या या भागात पोहोचलेला नाही.

प्रग्यान हा सहा चाकी रोव्हर असून सध्या तो विक्रम लँडरमध्ये आहे. प्रग्यान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग, पाणी, खड्डे यासंबंधीची माहिती इस्रोला पाठवेल. यातून चंद्राबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते. लँडिंगच्यावेळी शास्त्रज्ञांसमोर चंद्रावरच्या धुळीचे आव्हान असेल. इस्रो पहिल्यांदाच अशा प्रकारे चंद्रावर लँडिंग करणार आहे. विक्रम लँडरच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश बनू शकतो. याआधी अमेरिका, यूएसएसआर आणि चीनच्या यानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 vikran lander close to moon dmp
First published on: 03-09-2019 at 13:37 IST