भारतात सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ चित्त्यांना आणलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात विलगीकरण आणि देखरेखेखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर चार चित्त्यांना जंगलात सोडण्यात आलं आहे. यातील एक चित्ता विजयपूर येथील झार बरोदा परिसरात पाहण्यास आला आहे. मानवीवस्तीजवळ हा चित्ता दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

याबाबत जिल्हा वनअधिकारी यांनी सांगितलं की, “ओवान नावाचा विजयपूर मधील झार बरोदा गावात शिरला आहे. हे गाव कुनो राष्ट्रीय उद्यानापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. याची माहिती मिळताच वनअधिकारी तातडीने गावात दाखल झाले. चित्त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.”

हेही वाचा : काँग्रेसच्या कार्यकाळात ४८,२०,६९,००,००,०० रुपयांचा घोटाळा, भाजपाचा VIDEO ट्वीट करत धक्कादायक आरोप

दरम्यान, शनिवार रात्री ओवान या चित्त्याने झार बडोदा गावात एका गायीची शिकार केली आहे. ही शिकार केलेली गाय ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीही भीती वाटत आहे.

हेही वाचा : “सत्तेच्या हव्यासापोटी नितीश कुमार…”, बिहारमध्ये अमित शाह यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

अलीकडेच कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. त्याचा व्हिडीओ केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करून माहिती दिली होती. तसेच, त्यांनी चित्ता प्रकल्प अधिकाऱ्यांचेही अभिनंदन केलं होतं.