चेन्नईच्या एका १७ वर्षीय मुलांने भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवरील एक बग दूर करण्यात मदत केली आहे. त्या बगमुळे लाखो प्रवासी आणि त्यांची खासगी माहिती उघड झाली असती. पण रंगनाथनच्या सतर्कतेमुळे हा बग लक्षात आला आणि लाखो प्रवाशांची मदत झाली आहे. रंगनाथन हा चेन्नईच्या तांबरम येथील एका खासगी शाळेत शिकतो. ऑनलाइन तिकीट बुक करत असताना त्याला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर एक बग आढळला. या बगमुळे लाखो प्रवासी आणि त्यांची खासगी माहिती उघड होऊ शकली असती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगनाथन सांगतो की, तो “ऑनलाइन तिकीट बुक करत असताना वेबसाइटवरील गंभीर इनसिक्योर ऑब्जेक्ट डायरेक्ट रेफरन्समुळे त्याला इतर प्रवाशांची माहिती मिळाली. ज्यामध्ये इतर प्रवाशांचे नाव, लिंग, वय, पीएनआर क्रमांक, ट्रेनबद्दलची माहिती, जाण्या-येण्याची ठिकाणं आणि प्रवासाची तारीख यासह बरेच तपशील यांचा समावेश होता. तसेच त्याला दुसऱ्यांच्या माहितीमध्ये फेरफार देखील करता येत होतं. या बगमुळे कोणीही इतरांची माहिती मिळवू शकतो, शिवाय त्यात दुसरी माहिती टाकून फेरफार करू शकतो. यामुळे लोकांच्या सुरक्षेसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात,” असं त्याने सांगितलं. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai boy helps irctc fix bug on its online platform hrc
First published on: 22-09-2021 at 12:19 IST