‘क्राय’ या सामाजिक संस्थेने देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत आणि त्यापैकी १९ दशलक्ष मुलांनी शिक्षणही सोडून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रायच्या अहवालानुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९.२ दशलक्ष मुलांचे विवाह झाले आहे तर याच वयोगटातील २.५ दशलक्ष मुली माता झाल्या आहेत. देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष मुलांवर शिक्षण आणि नोकरी यांचा ताळमेळ न साधता आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. शिक्षण सोडण्याचे प्रमाण पाहता शिक्षणाच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज असून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षणही मोफत देण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child labor in india
First published on: 13-07-2018 at 01:16 IST