China And US Conflicts: अमेरिकेने नुकताच काही चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमेरिकेच्या या निर्णयावर चीन सरकारने टीका केली असून, अमेरिकेचा हा निर्णय “अवास्तव” आणि वैचारिकदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून कठोर व्हिसा धोरणे जाहीर केल्यानंतर, चीनने याचा अमेरिकेकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे. याला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी दुजोरा दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाल्या की, “अमेरिकेने विचारसरणी आणि राष्ट्रीय हक्कांचे कारण देत चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा अवास्तवपणे रद्द केले आहेत. त्यामुळे चीन या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. आम्ही याबाबत अमेरिकेकडे तक्रार दाखल केली आहे.”

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी आज एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “अमेरिका लवकरच ज्या विद्यार्थ्यांचे चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध त्या चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यास सुरुवात करणार आहे.”

दरम्यान अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये चीनी विद्यार्थ्यी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात २ लाख ७० हजारांहून अधिक चिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकन शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी केली आहे.

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्री विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले आहे. या निर्णयांमुळे आधीच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, विर्थ्यार्थी व्हिसाचे नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर अमेरिकेन प्रशासनाने गेल्या आठवड्यात नवीन व्हिसा मुलाखतींचे वेळापत्रक स्थगित केले होते. हा निर्णय अर्जदारांची सोशल मीडियावरील वर्तणूक तपासण्यासाठी घेण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी करण्यासाठी मोहिमे सुरू केली आहे. मात्र, यावर विविध स्तरातून टीका होत आहे.