बीजिंग : ईशान्य चीनमधील चंगचन शहरात करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळत असल्याच्या पार्श्वभू्मीवर सरकारने शुक्रवारी तेथे टाळेबंदीचे आदेश जारी केले. या शहराच्या सुमारे ९० लाख लोकसंख्येला कठोर करोना निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.  शुक्रवारी चीनमध्ये स्थानिक संक्रमणाचे नवे ३९७ रुग्ण नोंदले गेले. त्यातील ९८ रुग्ण हे जिलिन प्रांतातले आहेत. हा परिसर चंगचन शहराच्या सभोवताली आहे. 

निर्बंधांनुसार, आता रहिवाशांना घरी थांबणे अनिवार्य केले आहे. याशिवाय त्यांना सामूहिक चाचण्यांच्या तीन फेऱ्यांत चाचणी करून घ्यावी लागेल. या शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारच्या दिवसभरातील रुग्णांपैकी केवळ दोन जण चंगचन शहरातील असले तरी संपूर्ण शहरात टाळेबंदी करण्याचा आग्रह सरकारी अधिकाऱ्यांनी धरला होता. करोनाबाबत चीनने शून्य तडजोड धोरण स्वीकारले असून एक किंवा त्याहून अधिक रुग्ण आढळला, तरी संपूर्ण वसाहत टाळेबंद केली जात आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याशिवाय जिलिन नावाच्या नजीकच्या शहरातही ९३ रुग्ण नोंदले गेले आहेत. तेथेही अंशत: निर्बंध लागू करण्यात आले असून त्या शहराचा संपर्क तोडण्यात आला आहे.