दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पैसे डबल करण्याचे आमीष दाखवून चिनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांना फसवले जात होते. आतापर्यंत ५ लाख भारतीयांकडून सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी दोन सीए, एक महिलेसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

हा घोटाळा मल्टी लेवल मार्केटींग मोहिमेद्वारे राबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तशेच यांनी केवळ लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा लुटला गेला नाही तर त्यांचा डेटाही चोरला आहे. पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, केवळ २ महिन्यांत १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

चीनी घोटाळेबाजांसाठी ११० हून अधिक कंपन्या स्थापन

पोलिसांच्या कारवाईनंतर वेगवेगळ्या बँक खात्यात ११ कोटी रुपयांची रक्कम ब्लॉक करण्यात आली आहे. तसेच ९७ लाख रुपये गुडगांवच्या एका सीए कडून जप्त करण्यात आली आहे. या सीएने चीनी घोटाळेबाजांसाठी ११० हून अधिक कंपन्या स्थापन केल्या होत्या.

हेही वाचा – मेहुल चोक्सी माझ्या घरी आला होता, हॉटेलमध्ये राहण्याचीही दिली होती ऑफर; जराबिकाचा गौप्यस्फोट

या अ‍ॅप्सद्वारे, गुंतवणूकदारांना २४-३५ दिवसांच्या आत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले गेले. गुंतवणूकीचा पर्याय किमान ३०० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत देण्यात आला. यातील एक अ‍ॅप ‘पॉवर बँक’ अलीकडेच गुगल प्ले स्टोअरमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

सोशल मीडियावरील पोस्टची दखल घेऊन तपास

पोलीस उपायुक्त अनयेश रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक सोशल मीडियावरील पॉवर बँक आणि ईझेड प्लॅन या अ‍ॅप्सच्या माध्यमातून झालेल्या फसवणूकीबद्दल लिहित होते. या पोस्टची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असता मोठा घोटाळा समोर आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉय म्हणाले, पोलिस अधीक्षक आदित्य गौतम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासणी केली आणि ईझेड प्लान वेबसाइटवर (www.ezplan.in) उपलब्ध असल्याचे आढळले. पॉवर बँक अ‍ॅपने स्वतःला बंगळरू स्थित तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी असल्याचे भासविले. मात्र, याचा सर्व्हर चीनमध्ये अस्तित्त्वात होता. या अ‍ॅपने वापरकर्त्यांच्या कॅमेरा, कॉन्टॅक्ट आणि स्टोरेजमध्ये प्रवेश मिळविला आणि वापरकर्त्याच्या डेटा देखील चोरला.

लोकांना उत्साहीत करण्यासाठी हे आधी सुरुवातीला लोकांना काही पैसे परत देत होते. त्यामुळे लोकांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्यास सुरवात केली. लोकांनी त्यांच्या ओळखीच्या मित्रांना देखील अ‍ॅप्समध्ये जोडले. एखाद्याने मोठी रक्कम गुंतवली तर त्याचे खाते ब्लॉक केले जायचे.