भारतातून अंजू ही महिला पाकिस्तानात गेली आणि तिने धर्म परिवर्तन करुन फातिमा हे नाव ठेवलं आहे. तसंच तिने निकाह केला आहे. ही बातमी ताजी असतानाच आता चीन मधल्या एका महिलेने पाकिस्तान गाठलं आहे. गाओ फेंग असं या २१ वर्षीय चिनी महिलेचं नाव आहे.
मागच्या आठवड्यात चीनमधून ही महिला गिलगीट या ठिकाणी आली. १८ वर्षांच्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात आली आहे. जावेद असं त्या मुलाचं नाव आहे. खैबरपखतुख्वा भागात ही चीनमधली मुलगी आली आहे. १८ वर्षांचा जावेद गाओ फेंगला घ्यायला गेला होता. तीन महिन्यांचा व्हिसा घेऊन ही तरुणी पाकिस्तानात आली आहे.
हे पण वाचा- “पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा व्हिसा आणि पासपोर्ट रद्द केला जावा आणि…”, पहिला पती अरविंदची मागणी
गिलगिटच्या रस्त्याने ही मुलगी बुधवारी इस्लामाबादला पोहचली आहे. २१ वर्षीय तरुणीला जावेद घ्यायला गेला होता. स्नॅपचॅटवर या दोघांची ओळख झाली आहे. जावेद हा १८ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानी सीमेवरचा बजौर जिल्ह्यात राहणारा आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- “आम्ही लिव्ह इनमध्ये राहतो कारण…” काय मते आहेत तरुणाईची
बजौर या ठिकाणी जावेदचं घर आहे. मात्र जावेद त्याच्या मैत्रिणीला घेऊन घरी गेलेला नाही. तो समरबाग तालुक्यात राहणाऱ्या मामाच्या घरी तो तिला घेऊन गेला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की स्नॅपचॅटच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शनिवारी मोहरम आहे त्या कारणाने सुरक्षेची दक्षता घेऊन या चिनी तरुणीला सुरक्षा दिली आहे. चीनहून आलेल्या या महिलेची सगळी कागदपत्रं वैध आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याआधी राजस्थानातून ३४ वर्षीय अंजू तिचा २९ वर्षीय मित्र नसरुल्लाहला भेटायला आली आहे. तसंच या दोघांचा निकाहही झाला आहे.