Crime News : आई आणि मोठ्या भावाने रॉयल इनफिल्ड दुचाकी विकल्याचा राग मनात ठेवून एका १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रांबरोबर इकडे-तिकडे फिरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या भावाने आणि आईने बाईक विकण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबियांच्या या निर्णयावर रागवलेल्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात घडली आहे.

इयत्ता नववीत शित असणाऱ्या या मुलाने आत्महत्या करण्याआगोदर “मृत्यू झाल्यावर माणसाचं काय होतं?” असा प्रश्न गुगलवर सर्च केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना ११ जानेवरी रोजी घडली. या मुलाचा मोठा भाऊ मेरठ वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयातून त्याच्या आईला घेऊन येण्यासाठी गेला होता. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता आणि त्यांना अचानक घरातून मोठा आवाज ऐकू आला.

मृत मुलाची आई आणि तिचा मोठा मुलगा दोघेही खिडकीतून घरात शिरले तर त्यांना लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा>> शेअर बाजार आज का कोसळला? जाणून घ्या तीन कारणे……

नेमकं काय झालं?

पोलिसांनी घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, या मुलाची आई मेरठच्या वेद्यकीय महाविद्यालय नर्स आहे, तर मोठा भाऊ हा स्पर्धा परीक्षेची तयार करत आहे आणि त्यांच्या वडीलांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. १७ वर्षीय मुलगा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देत नव्हता त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्याला सतत रागवत असत. तसेच मित्रांबरोबर बाहेर फिरण्यावरून देखील त्याला बोलणी बसत असत.

हेही वाचा>> जगातील सर्वात मंद वाहतूक असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये तीन भारतीय; मुंबई-पुण्याचा क्रमांक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान त्यांनी त्या मुलाची बाईक विकण्याचा निर्णय घेतला. असे केल्याने तो त्याच्या अभ्यासावर लक्ष देईल असा कुटुंबियांचा कयास होता. पण बाईक विकल्याचा राग मनात धरून त्या मुलाने आत्महत्या केली, असेही पोलि‍सांनी सांगितले.