गेल्या महिन्यात अमेरिकेच्या इंधान वाहून नेणाऱ्या एका पाईपलाईनवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे काही काळासाठी ही पाईपलाईन बंद करण्यात आली होती. अमेरिकेच्या कोलोनियल कंपनीच्या पाईपलाईनवर हा सायबर हल्ला करण्यात आला आणि १०० जीबी डेटाची चोरी करण्यात आली होती. डेटा परत मिळवण्यासाठी कंपनीने ४.४ मिलियन डॉलर (जवळपास ३२ करोड २० लाख रुपये) रुपयांची खंडणी दिली होती. अमेरिकेने आता ही रक्कम पुन्हा मिळवण्यास सुरुवात केली आहे. खंडणीस्वरुपात दिलेली रकमेपैकी मोठी रक्कम पुन्हा वसूल केल्याचा दावा अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती खंडणीची रक्कम

रशियन हॅकर्सनी ही कोट्यावधींची रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती. अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी ४ मिलियन डॉलरचे ७५ बिटकॉइन शोधून काढले आहेत. यामध्येच त्या हॅकर्सनी खंडणी म्हणून वसूल केलेली रक्कम गुंतवली होती. पाईपलाईनवर केलेल्या सायबर हल्ल्यामुळे अमेरिकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दिवस इंधनाची कमतरता निर्माण झाल्याने विमानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनाचे दर वाढले होते.

हॅकिंग म्हणजे काय?, मोबाइल कसे हॅक होतात?, FB Account, Whatsapp हॅक होऊ शकतं?

तपासासाठी टास्क फोर्सची निर्मिती

बायडेन यांच्या प्रशासनाने न्याय विभागाच्या अंतर्गत एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती केली होती. खंडणीसारख्या प्रकरणांमध्ये काम करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. या टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांनी खंडणीचा मागोवा घेतला आणि त्यानंतर डार्कसाइडवरील २३ वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक खात्यांचा तपास करण्यास सुरुवात केली. यामधून सुमारे ६३.७ बिटकॉइन जप्त करण्यात आले.

“नफ्यासाठी अगदी संपूर्ण शहरांना ओलिस ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक वापर करण्यात येत आहे. २१व्या शतकातील हे मोठे आव्हान आहे असे डिप्टी अ‍ॅटर्नी जनरल लिसा मोनाको यांनी सांगितले. खंडणी आणि इतर सायबर-हल्ले रोखण्यासाठी आम्ही आमची सर्व उपकरणे व संसाधनांचा वापर सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती डेप्युटी अॅटर्नी जनरल लिसा मोनाको यांनी या कारवाईनंतर दिली.

सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मोबाइल हाताळताना ‘या’ १६ गोष्टींची काळजी घ्याच

कंपनीच्या कॉम्प्युटरवर आली होती खंडणीची धमकी

गेल्या महिन्यात ७ मे रोजी सायबर हल्ल्यानंतर कंपनीच्या एका कर्मचार्‍यास नियंत्रण कक्षातील कॉम्प्युटर हॅकर्सकडून खंडणीचे पत्र पाठवले होते. त्या रात्री कंपनीच्या सीईओंना निर्णय घ्यावा लागला आणि खंडणीची रक्कम हॅकर्सना द्यावी लागली. कंपनीवर जेव्हा सायबर हल्ला झाला तेव्हा जवळपास पाच दिवस या सेवा खंडित झाल्या होत्या. त्याचा थेट परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colonial pipeline company was taken by russian hackers as ransom now united states has recovered 4 million abn
First published on: 09-06-2021 at 11:27 IST