जागतिक स्तरावर गॅसच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत १८८५ रुपयांवरून १८५९ रुपयांवर पोहोचली आहे. तर कोलकात्यात हे भाव १९५९ रुपये तर मुंबईत १८११ रुपये, असे नवे दर असतील.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, गेल्या महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. तसेच यापूर्वी ६ जुलै रोजीही १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति युनिट ८.५ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर १९ मे २०२२ रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती.