गुजरातमधील एका वास्तुरचनाकार तरुणीवर मोदी सरकारने ‘पाळत’ ठेवल्याचे प्रकरण मोदींना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. कारण, त्या तरुणीबरोबर नरेंद्र मोदींचे जवळचे संबंध होते, या तरुणीचे एका आयएएस अधिकाऱयाबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून मोदी सरकारने त्या तरुणीवर पाळत ठेवली होती असा आरोप गुजरातमधील मोदींचे विरोधक शक्तीसिंह  गोहिल यांनी केला आहे.
गरज भासल्यास ‘पाळत’ प्रकरणाची चौकशी- सुशीलकुमार शिंदे
या प्रकरणावरून मोदींनी माणूसकी दाखवून आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही गोहिल यांनी केली आहे. या संबंधी गोहिल यांनी आणखी काही खुलासे केले-  
गोहिल म्हणाले,”माहितीच्या अधिकारातून मी काही महत्वाची कागदपत्रे मिळविली आहेत. त्यात मोदींनी जनतेचा पैसा आपल्या जवळच्यांचे (त्या युवतीचे) मोबाईल बिल, पेट्रोल भरण्यासाठी केला आहे. त्याचबरोबर मोदी एका हॉटेलमध्ये  ‘त्या’ व्यक्तीसोबत  दूधपौवा (गुजराती गोड पदार्थ) खाण्यासाठी गेले होते. त्या हॉटेलचे १२,५०० रु. बिलही आहे.” असेही गोहिल म्हणाले.
त्यावेळी त्यांच्यासोबत असलेली ती व्यक्ती ही ‘पाळत’ ठेवण्यात आलेली व्यक्तीच होती का? यावर गोहिल यांनी म्हटले की, “हो ,सध्याचे ‘पाळत’ प्रकरण सुरू असलेली तिच तरुणी मोदींसोबत होती.”
युवतीवर ‘पाळत’ प्रकरणावरील याचिकेवरून नरेंद्र मोदींची कोंडी?  
माझ्याकडे असलेली कागदपत्रे मी आता जाहीर करणार नाही. कारण, त्यावर संबंधित तरुणीचेही नाव आहे. तिचे नाव मला जाहीर करायचे नाही. त्यामुळे आधी मोदींचा यासर्व प्रकरणावर नकार येऊदे मग, मी त्यांच्यासमोर ही सर्व कागदपत्रे सादर करतो असेही गोहील म्हणाले आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रतिक्रियेवर आता साऱयांचे लक्ष लागून राहीले आहे.