scorecardresearch

Premium

शरद पवारांच्या घरी ‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाबाबत काय निर्णय झाला? काँग्रेस नेते म्हणाले…

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. यात आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या विषयाचाही समावेश आहे.

INDIA alliance meeting2
शरद पवारांच्या घरी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली. (शरद पवार ट्विटर)

देशभरातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने मुंबईत समन्वय समितीची घोषणा झाल्यानंतर बुधवारी (१३ सप्टेंबर) दिल्लीत शरद पवारांच्या घरी या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत समितीने महत्त्वाचे निर्णय घेतले. यात आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या विषयाचाही समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

के. सी. वेणुगोपाल इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती देत म्हणाले, “समन्वय समितीने ठरवलं आहे की, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. विविध पक्षांचे सदस्य बैठका घेऊन जागावाटप लवकरात लवकर निश्चित करतील.”

cross voting in Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!
Former President Donald Trump won the Republican Party nomination for the presidency
साउथ कॅरोलिनामध्ये ट्रम्प यांचा विजय; उमेदवारीसाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचा हॅले यांचा निर्धार
Hearing on Sharad Pawar petition today
शरद पवारांच्या याचिकेवर आज सुनावणी
Loksabha Election 2024
लोकसभा स्वबळावर लढण्याच्या ‘आप’च्या निर्णयानंतर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू; इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढणार?

“भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजकीय सुडाच्या भावनेने कारवाई”

इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती देताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “आज शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. यात १२ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसचे अभिजीत बॅनर्जी यांना ईडीने समन्स पाठवल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय सुडाच्या भावनेने ही कारवाई केली आहे.”

हेही वाचा : VIDEO: शरद पवारांच्या घरी ‘इंडिया’ समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मोठी घोषणा; म्हणाले…

“देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय”

“समन्वय समितीने देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली जाहीर सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. या सभेत वाढती महागाई, बेरोजगारी आणि भाजपाच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील. याशिवाय समन्वय समितीने जातनिहाय गणनेचा विषयही चर्चेत घेतला,” अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader comment on seat distribution of india alliance pbs

First published on: 13-09-2023 at 19:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×