काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत’ असं वक्तव्य उदीत राज यांनी केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या विधानानंतर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उदीत राज यांनी स्पष्टीकरण देताना हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.

उदीत राज यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल”.

sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
pimpri chinchwad NCP is on the verge of a split
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Former MLA-activist abused each other in front of Congress National Secretary in Dhule
धुळ्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांसमोर माजी आमदार-कार्यकर्त्यांत शिवीगाळ
Four former corporators from Ajit Pawars NCP warn that Mahavikas Aghadi option remains open
चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा भाजपचे…’ अजितदादांच्या माजी नगरसेवकांचा इशारा
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट

उदीत राज यांच्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ‘ही आदिवासी विरोधी मानसिकता’ असल्याची टीका भाजपाने केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

भाजपाची टीका

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे की “उदीत राज यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी वापरलेले शब्द दुर्दैवी असून, चिंता वाढवणारे आहेत. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनीही हे केलं आहे. यावरुन त्यांची आदिवासी विरोधी विचारसरणी समोर येते”.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

भाजपाच्या शेहजाद पुनावाला यांनीदेखील ट्विट केलं आहे. “अजॉय कुमार यांनी मुर्मू यांना पापी म्हटल्यानंतर आणि अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केल्यानंतर काँग्रेसची पातळी आणखी खालावली आहे. उदीत राज यांनी पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह भाषा वारली आहे. काँग्रेसला आदिवासी समाजाचा हा अपमान मान्य आहे का?” अशी विचारणा केली आहे.

उदीत राज यांचं स्पष्टीकरण

दरम्यान उदीत राज यांनी वाद वाढू लागल्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून हे आपलं वैयक्तिक मत असून, पक्षाचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगत सारवासारव केली आहे. ते म्हणाले “द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी आणि प्रचार आदिवीसांच्या नावेच करण्यात आला होता. याचा अर्थ त्या आता आदिवासी नाहीत असा होत नाही. जेव्हा अनुसूचित जाती/जमातीमधील एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करत मूक बनते तेव्हा मला वेदना होतात”.

महिला आयोगाचा माफी मागण्याचा आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाने उदीत राज यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. महिला आयोगाने उदीत राज यांना नोटीस पाठवली असून माफी मागण्यास सांगितलं आहे.