अहमदाबाद : ‘‘काँग्रेस सत्तेवर असताना २०१४ पूर्वी या पक्षाच्या नेत्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण आधुनिक बनवण्याच्या नावाखाली पैसे कमावले,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. गांधीनगर जिल्ह्यातील कलोल येथे एका सभेत बोलताना शहा म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील चित्र बदलले.

हेही वाचा >>> भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते

हेही वाचा >>> काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अनिश्चितता

शाह सोमवारपासून गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या हस्ते कलोल येथे मंगळवारी दोन रुग्णालयांचे भूमिपूजन झाले. शहा म्हणाले, की आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत, ६० कोटी गरीब नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ६४ हजार कोटींची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत ६०० जिल्ह्यांतील रुग्णालयांत ३५ हजार नवीन खाटा समाविष्ट केल्या आहेत. देशात एकात्मिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रे उभारण्यासाठी एक हजार ६०० कोटींची अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू; उत्तर प्रदेशात निदर्शने, दगडफेक, जाळपोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, की २०१४ पर्यंत देशात खासगी आणि सरकारी अशी ३८७ वैद्यकीय महाविद्यालये सुरू होती. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने ही संख्या ६०० वर पोहोचली आहे. ‘एमबीबीएस’च्या जागांची संख्याही वाढली आहे. २०१३-१४ मध्ये ५१ हजार ३८४ जागा होत्या. त्या आता ८९ हजार ८७५ पर्यंत वाढल्या आहेत. आता पदव्युत्तर पदवीसाठीच्या जागा ३१ हजार १८५ वरून ६० हजार २०२ पर्यंत वाढल्या आहेत. याचाच अर्थ गेल्या आठ वर्षांत वैद्यकीय जागांची संख्या दुपटीने वाढली आहे.