scorecardresearch

काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अनिश्चितता

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, शशी थरूर यांच्याविरोधात कोण रिंगणात उरणार, याबाबत मंगळवारी दिवसभर अनिश्चिततेचे वातावरण होते. 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अनिश्चितता
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, शशी थरूर यांच्याविरोधात कोण रिंगणात उरणार, याबाबत मंगळवारी दिवसभर अनिश्चिततेचे वातावरण होते. 

हेही वाचा >>> ‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’

हेही वाचा >>> भारतासह पाकिस्तानही अमेरिकेचा भागीदार; अमेरिकेची प्रतिक्रिया

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गांधी कुटुंबाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी त्यांच्यावर कमालीच्या नाराज असल्याचे समजते. मात्र, गेहलोत हे दिल्लीला येऊन सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. आपल्या निष्ठावानांनी चूक केल्याचे गेहलोतांचे म्हणणे असून, गांधी कुटुंबाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेहलोतांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्षपदाच्या उमेदवारासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या