वादग्रस्त अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हे नाटक आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाचे नामकरण भारतीय नौटंकी काँग्रेस असे करावे, असे भाजपने म्हटले आहे.
आपण स्वपक्षीयांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखविण्याचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला. अयशस्वी पटकथा असलेले ते नाटक होते, असे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे.
त्यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या पक्षाचे नामकरण भारतीय नौटंकी काँग्रेस असे करावे, कारण निवडणुकीनंतर त्या पक्षाला अशा प्रकारच्या पटकथा लिहिण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘आता भारतीय नौटंकी काँग्रेस’असे पक्षाचे नामकरण करावे’
वादग्रस्त अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हे नाटक आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाचे

First published on: 29-09-2013 at 02:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress should change its name to indian nautanki congress bjp