गुजरातच्या काँग्रेस नेत्याने गुजरात विधानसभेत झुंडबळीबद्दल चाललेल्या चर्चेदरम्यान धर्म परिवर्तनाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेस नेते गयासुद्दीन शेख यांनी विधानसभेत सांगितलं की गेल्या २ वर्षांत अनेक मुस्लीम मुलींनी हिंदू धर्म स्विकारला असून हिंदू मुलांशी विवाह केला आहे. शेख यांनी सांगितलं की अशा सामाजिक घटना जनतेसमोर यायला हव्यात.


काँग्रेस नेते गयासुद्दीन शेख यांनी झुंडबळी अर्था मॉब लिंचिंगबद्दल बोलताना सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी मणिनगरमध्ये एक मुस्लीम युवक आपल्या हिंदू मैत्रिणीसोबत होता. त्यावेळी त्यांना खूप मारहाण झालीय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की दोन्ही कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध होते. ही घटना दुर्दैवी आहे. वडिलांच्या या जबाबानंतरही आत्तापर्यंत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

हेही वाचा – “शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना जाळ्यात ओढतात”; लव जिहादबद्दल माजी निवडणूक आयुक्तांचं विधान
काँग्रेस नेते शेख यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत की एका समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. एवढंच नव्हे तर वृत्तवाहिन्यासुद्धा हिंदू-मुस्लीम चर्चांवर अधिक भर देत आहेत. लग्नासाठी धर्म परिवर्तन करणाऱ्या भगिनींच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत अधिक मुस्लीम मुलींनी हिंदू धर्माचा स्विकार करून लग्न केलं आहे. गेल्यावेळी मी अशी १०० उदाहरणे सादर केली होती. अशा मुद्द्यांसोबत छेडछाड करून त्यांना समोर आणलं जातं हे गंभीर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – कर्नाटकातल्या हिंदू मंदिराबाहेर मुस्लिमांच्या दुकानांवर बंदी; संतप्त भाजपा नेत्यांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “हा वेडेपणा…”
शेख यांनी गुजरात सरकावर अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. सरकार अल्पसंख्याक विभागाच्या बजेटमध्ये सातत्याने घट करत आहे, अल्पसंख्याक विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत नसल्याचंही शेख यांनी सांगितलं आहे.