देशात गेल्या काही दिवसांपासून सतत ४० हजारांपेक्षा रुग्ण आढळत होते. पण दिलासादायक म्हणजे देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ हजार ९०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. रविवारच्या तुलनेत आज सापडलेली रुग्णसंख्या ८.९ टक्क्यांनी कमी आहे. रविवारी देशात ४२ हजार ७६६ करोनाबाधित आढळले होते. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.४४ टक्क्यांवर आहे.

देशात सध्या ४ लाख ४ हजार ८७४ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख २७ हजार ६२१वर पोहोचले आहेत. त्यापैकी ३ कोटी २१ लाख ८१ हजार ९९५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ लाख ४० हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.५८ टक्क्यांवर असून हा दर सलग ७३व्या दिवशी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट २.७६ टक्के आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांत २५ लाख २३ हजार ८९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६८.७५ कोटी लोकांचं लसीकरण झालंय.