लखनौ : करोना आणि काळ्या बुरशीवरील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सची चोरी करून ती चढ्या दराने रुग्णांच्या नातेवाईकांना विकणाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरसह इतर ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सहा जणांना येथील राफेयाम क्लबनजीक अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २८ लायपोसोमल अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन आणि १८ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. यांच्यापैकी डॉ. वामिक हुसेन हा एमबीबीएस डॉक्टर असून, मोहम्मद रकीब, मोहम्मद आरिफ, मोहम्मद इम्रान, राजेश कुमार सिंह व बलवीर सिंह हे निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये काम करणारे वॉर्डबॉय आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांनी दिली. हे आरोपी रुग्णालयांमधून इंजेक्शन चोरत असत आणि ते नंतर चढ्या दराने रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असत, असेही पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona six arrested for stealing mucormycosis injections akp
First published on: 10-06-2021 at 00:01 IST