भारतात मागील २४ तासात करोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ इतकी झालीय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत करोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ इतकी झालीय. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झालेत. २१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ इतकी होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली.

याशिवाय पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत करण्यात आला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश करोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली आहे, अशी माहिती केरळ आरोग्य विभागाने दिलीय.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संकट

दरम्यान, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. बाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असून अनेक पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. तसंच मनोरंजनाच्या अनेक ठिकाणी टाळं लावण्यात आलं आहे. काही भागांमध्ये तर लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : करोनाचा भारतावर दूरगामी परिणाम, पुन्हा ओढवली १० वर्षांपूर्वीची स्थिती; संशोधन संस्थेच्या अहवालाचे चिंताजनक निष्कर्ष!

दुसरीकडे चीनच्या Lanzhou भागात लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर घराबाहेर पडणाऱ्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

विमानांचं उड्डाण रद्द, लॉकडाउनचाही निर्णय

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे. सध्या चीनमध्ये गेल्या २४ तासाच १३ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही अॅक्टिव्ह रुग्ण आढळू नये यासाठी चीनकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळेच एकही रुग्ण सापडला तरी चिनी प्रशासन गांभीर्याने घेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona statistics latest updates on india on 23 october 2021 pbs
First published on: 23-10-2021 at 11:40 IST