भारतात मागील २४ तासात (६ नोव्हेंबर) नव्यानं १० हजार ९२९ करोना रुग्ण आढळले आहेत. तसेच ३९२ करोना रुग्णांचा मृत्यू झालाय. याशिवाय मागील २४ तासात एकूण १२ हजार ५०९ करोना रुग्ण बरे झालेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ९५० इतकी आहे. देशातील एकूण मृतांची संख्या ४ लाख ६० हजार २६५ वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर वेगानं करोना विरोधी लसीकरण करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आग्रही आहेत. सध्या देशभरात १०७ कोटी ९२ लाख १९ हजार ५४६ डोसचं लसीकरण झालंय.

मागील सलग २९ दिवसांपासून देशातील दररोजच्या करोना रुग्णांची संख्या २० हजारच्या खाली आहे. याशिवाय मागील १३२ दिवसांपासून ५० हजार रुग्णसंख्येच्या खाली नव्या करोना रुग्णांची नोंद आहे.

दररोजच्या करोना रुग्ण वाढीचा दर १.३५ इतका आहे. मागील ३३ दिवसांपासून हा दर २ टक्क्यांच्या खाली आहे. साप्ताहिक करोना वाढीचा दर १.२७ इतका नोंदवला गेलाय. मागील ४२ दिवसांपासून साप्ताहिक करोना वाढीचा दर २ टक्क्यांच्या खाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय.