भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाला नवे शस्त्र मिळणार आहे. ही एक गोळी आहे जी करोना रूग्णांना दिली जाईल आणि त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करणार आहे. मर्कचे अँटीव्हायरल औषध ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) करोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजूर केले जाईल. हे औषध प्रौढांसाठी असेल ज्यांना करोनाची गंभीर लक्षणे आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची भीती वाटत आहे, असे डॉ राम विश्वकर्मा, अध्यक्ष, कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, सीएसआयआर यांनी सांगितले.

कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप डॉ. राम विश्वकर्मा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, फायझरच्या गोळी पॅक्सलोव्हिडसाठी थोडा वेळ लागू शकतो. या दोन औषधांच्या येण्याने चांगला परिणाम होईल. करोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरणापेक्षा त्या अधिक प्रभावी ठरतील.

“मला वाटतं मोल्नुपिरावीर लवकरच उपलब्ध होईल. अशा पाच कंपन्या आहेत ज्या औषध निर्मात्यांसोबत काम करत आहेत. मला वाटते की अशा परिस्थितीत, आपल्याला त्या कधीही वापरण्याची परवानगी मिळू शकते,” असे डॉ राम विश्वकर्मा म्हणाले. त्याच वेळी, फायझरने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या औषधामुळे कमकुवत रूग्णांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता किंवा मृत्यूचा धोका ८९ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

मर्क कंपनीने आधीच पाच कंपन्यांशी करार केला आहे आणि मर्कने अनेक कंपन्यांना परवाना दिला आहे. फायझर देखील तेच करेल कारण त्यांना जागतिक वापरासाठी आवश्यक औषधे तयार करण्यासाठी भारतीय कंपन्या वापराव्या लागणार आहेत.

करोनाच्या उपचारात उपयुक्त मानली जाणारी ही गोळी ‘मर्क’ नावाच्या औषध कंपनीने विकसित केली आहे. ऑक्टोबरमध्ये, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जाहीर केले की त्यांनी मोल्नुपिरावीरचे ४८०,००० डोस घेतले आहेत आणि आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात याची मदत होईल अशी अपेक्षा आहे.