जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे. करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसाच्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.

सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसांमध्ये भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. याच वेगाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत राहिल्यास या आठवड्याच्या शेवटपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक असेल. पहिल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळालं. त्यामुळे सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस जास्तीत जास्त काळ घऱात थांबू आणि करोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

देशामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांचा क्रमांक लागतो. केरळमधील कासारगौड तर महारष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर कर्नाटकमध्ये बेंगळुरु जिल्ह्यात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आले आहेत. करोनाने ईशान्य भारतामधील राज्यांमध्येही शिरकाव केला असून मंगळवारी दुपारपर्यंत मणिपूर आणि मिझोरममध्ये प्रत्येकी एक रुग्ण अढळून आळा होता. ईशान्येमधील इतर राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण अद्याप सापडलेले नाहीत. मंगळवार दुपारपर्यंत म्हणजेच लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर सोळा तासांनंतर गोवा आणि झारखंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण अढळून आला नव्हता.

मंगळवार आणि बुधवारची तुलना केल्यास केरळ, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये २४ तासाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक रुग्ण अढळून आले. गुरुवार सकाळपर्यंत जगभरामध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या चार लाख ६८ हजारहून अधिक झाला आहे. आज (बुधवार) सकाळपर्यंत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची जगभरातील संख्या २१ हजारहून अधिक झाली आहे. यामध्ये इटली, चीन, स्पेन, इराण आणि फ्रान्स या पाच देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. चीननंतर आता युरोप आणि अमेरिका हे करोना संसर्गाचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतामध्ये बुधवारी रात्रीपर्यंत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. भारतामध्ये करोनाची चाचणी करण्यासाठी काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहे. यामध्ये करोनाची लक्षणं दिसत असली तर किंवा परदेशात जाऊन आला असाल तरच चाचणी केली जाईल असं यंत्रणांमार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असतानचा आता खासगी लॅबलाही करोनाची चाचणी करण्याचा अधिकार सरकारकडून देण्यात आल्याने चाचणी करण्याचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र जगभराप्रमाणे भविष्यात भारतामध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढेल असं मानलं जातं आहे. त्यामुळेच करोनाचा कमीत कमी प्रसार व्हावा यासाठी नागरिकांनी घरातच बसावे असं आवाहन सरकारी यंत्रणांद्वारे केले जात आहे.