करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अनेक अजब घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मंगळुरुत घडली आहे. आपल्या मित्राला घरी येण्याची परवानगी सोसायटीकडून मिळत नसल्याने तरुणाने आपल्या मित्राला सुटकेसमध्ये भरुन घरी नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय तरुणाच्या या जीवघेण्या कृत्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची भीती असल्याने मंगळुरुच्या या सोसायटीने बाहेरच्या लोकांना आतमध्ये प्रवेशास बंदी घातली होती. तरुणाने सोसायटीकडे आपल्या मित्राला येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. पण ही विनंती फेटाळून लावण्यात आली. यानंतर तरुणाने ही जीवघेणी शक्कल लढवली. सोसायटीने मात्र तरुणाने अशी कोणतीही विनंती केली नसल्याचं सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण रात्री दोन वाजता आपली गाडी घेऊन बाहेर पडला होता. यावेळी त्याने आपल्या मित्राला बोलावलं. यानंतर त्याला सोबत घेऊन तो सोसायटीत आला. सोसायटीत पोहोचल्यानंतर त्याने मित्राला सुटकेसमध्ये बसण्यास सांगितलं आणि ती घेऊन जाऊ लागला. सुटकेसमध्ये हालचाल होत असल्याने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला संशय आला आणि त्याने सोसायटीला कळवलं. सोसायटीच्या सदस्यांना सुटकेस उघडून पाहिलं असता त्यांना धक्काच बसला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही तरुणांना आपल्या ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना बोलावून समज देण्यात आली. दोन्ही तरुण अल्पवयीन असल्याने ताकीद देऊन सोडून देण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus teenager takes friend to apartment in suitcase sgy
First published on: 13-04-2020 at 11:09 IST