ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायलायच्या न्यायाधीश रोसा वेबर यांनी शुक्रवारी रात्री उशीरा बोलसेनारो यांच्या विरोधात सरकारी वकिलांचे कार्यालय आणि पीजीआरद्वारे चौकशीसाठी परवानगी दिली आहे. ही चौकशी भारतीय कोविड-19 लस कोव्हॅक्सिनच्या खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोल्सोनारो हे लस निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक सोबत फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेल्या २० दशलक्ष डोससाठी करण्यात आलेल्या ३१.६ कोटी डॉलरच्या करारातील अनियमिततांच्या आरोपांचा सामना करत आहेत. ब्राझीलियन फेडर प्रोसिक्युटर अॅण्ड कंट्रोलर जनरल ऑफिस किंवा सीजीयू देखील व्यवहारातील कथित अनियमितांची वेगळी चौकशी करत आहे. खासदारांच्या मते, या प्रकरणी कथितरित्या काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात सरकारचे मुख्य प्रतोद रिकार्डो बैरोस देखील सहभागी आहेत. तर, बोल्सोनारो आणि बैरोस यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत.

ब्राझीलकडून ‘कोव्हॅक्सिन’ खरेदी करार स्थगित

तर, ब्राझीलमध्ये भारत बायोटेक या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लशीच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून, ते प्रकरण गाजत असतानाच ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिन खरेदी आदेश रद्द केला आहे.
ब्राझीलने आम्हाला अग्रीमाची कुठलीही रक्कम दिलेली नाही, असे भारत बायोटेक या लस निर्मात्या कंपनीने म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन लस खरेदीत बरेच गैरप्रकार झाल्याचे ब्राझीलमध्ये उघड झाले आहे. सीजीयू ऑनलाइनवर असे कळवण्यात आले आहे की, कोव्हॅक्सिन खरेदी करार तात्पुरता रद्द करण्यात येत आहे. सीजीयूच्या प्राथमिक निष्कर्षानुसार खरेदीत गैरप्रकार झाले असून पुढील चौकशी होईपर्यंत खरेदी बंद करण्यात येत आहे, असे ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो क्विरोगा यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covaxin corruption in brazil supreme court give permission to president inquiry msr
First published on: 04-07-2021 at 18:18 IST