देशभरात सध्या करोना प्रतिबंधक लसीकऱण सुरु आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सुरु आहे. खासगी तसंच सरकारी रुग्णालयात ही लसीकरण मोहीम सुरु आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत मिळत आहे, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी किंमत मोजावी लागत आहे. मात्र दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी लस घ्यायची असेल तर त्यासाठी आगाऊ नोंदणी कऱणं आवश्यक आहे.

या नोंदणी प्रक्रियेबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अनेकांना ही नोंदणी कऱण्यासाठी काय प्रक्रिया आहे याबद्दलची पुरेशी माहिती नाही. तर अनेकांना लसीकरणासाठी स्लॉट मिळत नाही. तुमच्या मनातल्या सर्व शंकांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लसीकरणासाठी वेगवेगळ्या माध्यमांमधून कशी नोंदणी करायची, सेंटर, अपॉईंटमेंट कशी बुक करायची याबद्दल जाणून घ्या.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
pune caste validity certificate marathi news
पुणे: जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम… काय करावे लागणार?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या

कोविन(CoWin) या पोर्टलच्या माध्यमातून कशी नोंदणी कराल?
१. ब्राऊजरमध्ये CoWin असं सर्च केल्यावर Cowin.gov.in ही लिंक समोर दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
२. ही लिंक ओपन झाल्यावर उजव्या कोपऱ्यात Register/Sign in yourself असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात येईल. तिथे मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर Get OTP हा पर्याय निवडा.
४. त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी साईटवर दिलेल्या जागेत भरा आणि Verify या पर्यायावर क्लिक करा.
५. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती विचारण्यात येईल. तुमचा फोटो असलेलं ओळखपत्र, नाव, लिंग, जन्मतारीख ही माहिती भरल्यानंतर खाली येणाऱ्या Register या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे.
६. नोंदणी पूर्ण झाल्यावर आता तुम्हाला लस घेण्यासाठी वेळ निश्चित करावी लागेल म्हणजेच अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला Schedule an appointment या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
७. यानंतर जर एकाच व्यक्तीची नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीच्या नावासमोर क्लिक करा. आणि जर एकापेक्षा जास्त जणांची नोंदणी केली असेल तर ज्यांच्यासाठी वेळ निश्चित करायची आहे, त्यांच्या नावासमोर क्लिक करा.
८. यानंतर Schedule हा पर्याय खाली दिसेल. त्यावर क्लिक करा.
९. यानंतर तुम्हाला लस ज्या परिसरात, ज्या गावात, शहरात घ्यायची आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला दोन पर्याय मिळतील.

1. Search with Pincode:

हा पर्याय निवडल्यास तुम्हाला ज्या भागात लस घ्यायची आहे, त्या भागाचा पिनकोड तुम्हाला रिकाम्या जागेत भरावा लागेल. हा पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातली लसीकरण केंद्रांबद्दलची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक करुन हवी ती वेळ आणि तारीख निवडा. आणि त्यानंतर Confirm या पर्यायावर क्लिक करा.

2. Search with District:

हा पर्याय निवडल्यास तुम्हाला ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात लस घ्यायची आहे, तो जिल्हा आणि राज्य निवडावं लागेल. ते निवडल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातली सर्व लसीकऱण केंद्रे दिसतील. त्यानंतर हवी ती वेळ आणि तारीख निवडून वरील प्रमाणेच वेळ निश्चित करु शकता.
लक्षात घ्या, एका तुम्ही एकावेळी ४ जणांसाठी नोंदणी करुन त्या सर्वांसाठी लसीकऱणाची वेळ निश्चित करु शकता.

आरोग्य सेतू(Aarogya Setu) अॅपच्या माध्यमातून नोंदणी कशी कराल?
१. आरोग्य सेतू अॅप जर तुमच्याकडे नसेल तर ते सर्वप्रथम ते प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावं लागेल.
२. आरोग्य सेतू अॅप ओपन केल्यावर तुम्हाला Vaccination असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
३. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात येईल. तो दिलेल्या रिकाम्या जागेत भरा. आणि Verify या पर्यायावर क्लिक करा.
४. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती विचारण्यात येईल. तुमचा फोटो असलेलं ओळखपत्र, नाव, लिंग, जन्मतारीख ही माहिती भरल्यानंतर खाली येणाऱ्या Register या पर्यायावर क्लिक करा.
५. नोंदणी पूर्ण झाल्यावर आता तुम्हाला लस घेण्यासाठी वेळ निश्चित करावी लागेल म्हणजेच अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला Schedule an appointment या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
६. यानंतर जर एकाच व्यक्तीची नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीच्या नावासमोर क्लिक करा. आणि जर एकापेक्षा जास्त जणांची नोंदणी केली असेल तर ज्यांच्यासाठी वेळ निश्चित करायची आहे, त्यांच्या नावासमोर क्लिक करा.
७. यानंतर तुम्हाला लस ज्या परिसरात, ज्या गावात, शहरात घ्यायची आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला दोन पर्याय मिळतील.

1. Search with Pincode:

हा पर्याय निवडल्यास तुम्हाला ज्या भागात लस घ्यायची आहे, त्या भागाचा पिनकोड तुम्हाला रिकाम्या जागेत भरावा लागेल. हा पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातली लसीकरण केंद्रांबद्दलची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक करुन हवी ती वेळ आणि तारीख निवडा. आणि त्यानंतर Confirm या पर्यायावर क्लिक करा.

2. Search with District:

हा पर्याय निवडल्यास तुम्हाला ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात लस घ्यायची आहे, तो जिल्हा आणि राज्य निवडावं लागेल. ते निवडल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातली सर्व लसीकऱण केंद्रे दिसतील. त्यानंतर हवी ती वेळ आणि तारीख निवडून वरील प्रमाणेच वेळ निश्चित करु शकता.

वेळ निश्चित केली असली तरी तुम्ही याला रीशेड्यूल करु शकता, पण लसीकरणाच्या तारखेआधी तुम्हाला ते करावं लागेल

लक्षात घ्या, सर्व्हरची समस्या उद्भवल्यास तुमची नोंदणी पूर्ण होण्यास अडथळा येऊ शकतो. अशावेळी योग्य हेच आहे की काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करणे. एकाच वेळी अनेक जण नोंदणी प्रक्रिया करत असल्यास ही समस्या उद्भवू शकते.