भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सध्या संघाच्या बाहेर आहे. धवनच्या अनुपस्थितीमध्ये लोकेश राहुल सलामीला येणार आहे. मात्र धवनची दुखापत बरी झाली नाही तर पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये कसून सराव केला. या सरावसत्रातही पंतने सहभाग घेतला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

यावेळी भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने सरावादरम्यान पंतला खास टिप्सही दिल्या

दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. चौथ्या क्रमांकाची जागा ही विजय शंकला मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Ind vs Pak : आमचा विजय निश्चीत, विराट कोहलीने व्यक्त केला आत्मविश्वास