२०१९ विश्वचषक स्पर्धेत रविवारी दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरीही टीम इंडियाने या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सरावसत्राचे फोटो शेअर केले आहेत.

शिखर धवनला झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे पर्यायी खेळाडू ऋषभ पंतही इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यानेही आज टीम इंडियासोबत सरावसत्रात सहभाग घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. चौथ्या क्रमांकाची जागा ही विजय शंकला मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.