सोमवारी बकरी ईदच्या दिवशी ओडिशा राज्यातील बालासोर येथे दोन समुदायात जातीय तणाव उफाळून आला. त्यानंतर राज्य सरकारने बालासोरमध्ये संचारबंदी लागू केली. गाईचा बळी दिल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. बालासोरचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे यांनी सांगितले की, संचारबंदी लागू केल्यानंतर हिंसा उसळल्याची नवी माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही पूर्ण शहरात आणखी काही काळ संचारबंदी कायम ठेवणार आहोत.

राज्य सरकारनेही इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बालासोर आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले की, तणाव निर्माण करणाऱ्या दोन्ही समुदायातील ३४ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आणखीही आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या ४३ तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त १५ तुकड्या मागविण्यात येत आहेत. तसेच चार आयपीएस अधिकारी आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुजू केले आहे.

जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?

संजय कुमार पुढे म्हणाले की, लोकांना कमीतकमी त्रास होईल आणि रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांना बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे.

प्रकरण नेमके काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार उत्तर ओडिशाच्या जातीय दृष्टीने अतिसंवेदनशील परिसरात तणाव उसळून आला. या ठिकाणी असलेल्या गटारातील पाणी लाल रंगाचे दिसल्यानंतर काही जणांनी पाण्यात रक्त मिसळले असल्याचा संशय व्यक्त केला. बकरी ईद असल्यामुळे गाईचा बळी दिला गेला असावा, अशी अफवा परिसरात उडाली. या अफवेनंतर दोन समुदायांमध्ये हिंसा उसळली. दोन्हीकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठी चार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांना ‘मोकळं’ करणार का? अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच पोलीस अधिकारी आणि नागरिक लाठी चार्जमध्ये जखमी झाले आहेत. तर काही वाहनांची तोडफोड झाली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि शांततेचे आवाहन केले.